यावर्षी अनेक ब्लॉकबस्टर सिनेमा दिले तरी Laxury कार नाही घेऊ शकत हे अभिनेता म्हणाला घराचा हफ्ता....
615 Oct 2024
यावर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला, तरी लक्झरी कार घेऊ शकत नाही; अभिनेता म्हणाला, "घराचा हफ्ता..."
1 / 7
२०२४ चा सर्वात ब्लॉकबस्टर सिनेमा देणारा अभिनेता. ज्याचे या वर्षात 4 सिनेमे रिलीज झाले असून चारही हिट झाले. त्यापैकी एका सिनेमाने तर तब्बल ८५० कोटींचा बिझनेस केला. असा अभिनेता लक्झरी कार घेण्याचा अजूनही विचारच करतोय असं म्हणलं तर विश्वास बसणार नाही ना?
2 / 7
हा अभिनेता आहे राजकुमार राव (Rajkumar Rao). राजकुमारचे यावर्षी "श्रीकांत","स्त्री २","मिस्टर अँड मिसेस माही" आणि "विकी और विद्या का वो वाला व्हिडिओ" हे चार सिनेमे रिलीज झालेत. चारही सिनेमांनी तगडी कमाई केली आहे.
3 / 7
स्त्री २ सारखा ब्लॉकबस्टर हिट देणाऱ्या राजकुमार रावची एक मुलाखत व्हायरल होत आहे. इतकी कमाई करुनही लक्झरी कार अजूनही घेऊ शकत नाही असं तो मुलाखतीत म्हणाला. यामागचं कारण त्याने सांगितलं आहे.
4 / 7
अनफिल्टर्ड विद समदीश या पॉडकास्टमध्ये राजकुमार म्हणाला, "यार, प्रामाणिकपणे सांगायचं तर इतके पैसेच नाहीयेत जितकं लोकांना वाटतं. घराता हफ्ता भरणं सुरु आहे. त्याची चांगली मोठी रक्कम दर महिन्याला जाते."
5 / 7
"असं नाही की पैसेच नाहीयेत. पण शोरुममध्ये जाऊन विचारेन की गाडीची किंमत काय? ६ कोटी चल हे घे असंही करता येणार नाही. मी ५० लाखापर्यंतची गाडी खरेदी करु शकतो. पण त्यासाठी सुद्धा आधी चर्चा होईल. हा पण २० लाखाची गाडी मी आरामात घेऊ शकेन. त्यासाठी विचार करायची गरज पडणार नाही."
6 / 7
एवढा मोठा अभिनेता पण त्याचे विचार अगदी सामान्यांसारखेच आहेत हे पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. त्याची ही मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
7 / 7
राजकुमार रावने 2021 साली अभिनेत्री पत्रलेखासोबत लग्नगाठ बांधली. दोघंही अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. "सिटी ऑफ ड्रीम्स" सिनेमात दोघांनी एकत्र काम केलं होतं.
0 likes
Top related questions
No related question available! Ask Your Question.
Related queries
Latest questions
06 Sep 2025 12
08 Aug 2025 7
07 Aug 2025 10
06 Aug 2025 12
02 Aug 2025 13
31 Jul 2025 10
